रायगडच्या भव्य प्रवेशद्वाराची पहिली विट रचण्याचा मान नारायणगावकरांना – युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले

नारायणगाव ,किरण वाजगे

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील शिवछत्रपती महाद्वार अतिशय आखीव-रेखीव असे बनवले असून ज्या पद्धतीने जनसेवा तरुण मंडळ व नारायणगावकरांनी जी मेहनत व कष्ट घेतले आहे ते खूप उल्लेखनीय आहे याच कारणामुळे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाच्या रस्त्यावरील प्रवेशद्वाराच्या कामाची पहिली वीट रचण्यासाठी पहिला मान नारायणगावकरांना देण्यात येईल असे प्रतिपादन युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले.

नारायणगाव येथील समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच जनसेवा तरुण मंडळाच्या वतीने भव्य ऐतिहासिक प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले बोलत होते.

या कार्यक्रमासाठी अनंत घोष मौनी बाबाजी, शिवसेनेचे उपनेते अल्ताफ शेख, सहसंपर्कप्रमुख संजय उकिरडे, आमदार अतुल बेनके, अतिश राजे पवार, आमदार महेश लांडगे, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, माजी आमदार शरद सोनवणे, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे, विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, अक्षय आढळराव पाटील, गणेश कवडे, गणपतराव फुलवडे, संतोष नाना खैरे, एकनाथ शेटे, किसनराव शेटे, बाळासाहेब पाटे आदी मान्यवर उपस्थित होते.हा कार्यक्रम अतिशय भव्यदिव्य पद्धतीने साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोनशिला अनावरण, राजाशिवछत्रपती प्रवेशद्वाराचे लोकार्पण, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमा पूजन व शिव आरती युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी अल्फा डान्स अकॅडमी च्या वतीने आकर्षक नृत्य तसेच समाज प्रबोधनात्मक नाटिका सादर करण्यात आली. आकर्षक विद्युत रोषणाई, शोभेचे दारूकाम तसेच हजारो शिवप्रेमींची उपस्थिती या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

याप्रसंगी सरपंच योगेश पाटे यांच्या सरपंचपदाच्या कारकीर्दीविषयीची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली. यावेळी राजा शिवछत्रपती प्रवेशद्वाराची उभारणी कशा पद्धतीने झाली याविषयीची चित्रफित सादर करण्यात आली.

यावेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे,महेश लांडगे, आशाताई बुचके, सत्यशिल शेरकर, अक्षय आढळराव आदींनी मनोगत व्यक्त केले.

करबिने यशस्वी करण्यासाठी माजी उपसरपंच संतोष वाजगे, ईश्वर पाटे, आरिफ आतार, महेश शिंदे, अजित वाजगे, सुदीप कसाबे, आकाश कानसकर, दीपक पांचाळ, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत महाजन, मेहबूब काझी, हेमंत कोल्हे यांनी केले तर आभार बिन्नी औटी यांनी मानले.

Previous articleराजगुरूनगर मध्ये माॕसाहेब मिनाताई ठाकरे यांना जयंती निमित्त अभिवादन
Next articleराम नगरकर कला गौरव पुरस्कार “महाराष्ट्राची हास्य जत्रा” फेम कलाकार समीर चौगुले यांना प्रदान