नारायणगाव येथे बैलगाडा शर्यत सुरू होणार असल्याने मोठा जल्लोष

नारायणगाव : किरण वाजगे

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यत सुरू करण्याला सशर्त परवानगी दिल्यामुळे बैलगाडा शौकीनांबरोबर ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी, शेतकर्‍यांनी तसेच कार्यकर्त्यांनी आज नारायणगावात आनंदोत्सव साजरा केला.

नारायणगाव येथे बैलगाडा, घोडी यांची डीजे व पारंपरिक वाद्यासह भंडारा उधळून, फटाके फोडून, नाचून मिरवणूक काढण्यात आली.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, राष्ट्रवादीचे युवा नेते अमित बेनके, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोषनाना खैरे, सरपंच योगेश पाटे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, अनिल खैरे, ईश्वर पाटे, अशिष माळवदकर, हेमंत कोल्हे, राजेश कोल्हे, गणेश वाजगे, जयेश कोकणे, राहुल गावडे, रोहिदास केदारी, योगेश तोडकर, अनिल गावडे, विशाल पाटील भुजबळ तसेच गाडामालक जगनशेठ कोराळे, प्रकाश कबाडी, राहुल बनकर, एकनाथ कसबे, समिर वाजगे, रूपेश खैरे, लक्ष्मण गाढवे, गिरीश बांगर, पप्पू नेहरकर, रंगनाथ गुळवे, गणेश भोर, किसन टाकळकर, श्रेयस झोडगे व बैलगाडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आशाताई बुचके, अमित बेनके, संतोषनाना खैरे, योगेश पाटे, आशिष माळवदकर यांनी बैलगाडा शर्यती विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Previous articleबैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविण्याच्या निर्णयाने पहिल्या टप्प्यातील लढाई महाविकास आघाडी सरकारने जिंकली-खा.डॉ.अमोल कोल्हे
Next articleवर्ष उलटलं..बारा आमदारांची नियुक्ती नाही, हे लोकशाहीत बसतं का ?