रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिंदवणे गावाच्या नागरिकांचे उपोषण

 अमोल भोसले,उरुळी कांचन

शिंदवणे येथील राज्यमार्ग क्र. ११७ या राज्यमार्गाचे डांबरीकरणाचे पुर्ण काम जानेवारी २०२२ पर्यंत पुर्ण करण्यात येईल असे P. W. D विभागाने आणि कंत्राटदाराने शिंदवणे ग्रामपंचायतीस कळविले होते. परंतु डिंसेबर २०२१ चालु झाला तरी या मार्गाचे कामही चालु झाले नाही. त्यामुळे नागरिकांनी संतप्त होत माजी सरपंच अण्णा महाडिक यांच्या नेतृत्वाखाली उपोषण आंदोलन सुरु केलं आहे.

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा देवस्थानाकडे या मार्गाने असंख्य लोक प्रवास करत असतात. उरुळी कांचन मार्गे सासवडला जाणारया या महामार्गाचे काम लवकरात लवकर पुर्ण व्हावे हि वारंवार विनंती करुनही संबंधित विभाग याकडे कानडोळा करत आहे. पण कंत्राटदार मात्र शासन आदेश नागरिकांच्या मागणीला खो देत असल्याने शिंदवणे गावाचे नागरिक चांगलेच आक्रमक झाले असून नागरिकांनी उपोषण आंदोलन सुरु केलं आहे.

नागरिकांच्या मूलभूत मागणीचाच विचार होत नसल्याने pwd विभाग झोपा काढत आहे का असा सवाल नागरिकांनी विचारला आहे नागरिकांच्या रेट्यामुळे जानेवारी २०२२ पर्यंत काम कोणत्या आधारावर पूर्ण करू हे सांगितले होते याचा नाकर्त्या अधिकाऱ्यांनी खुलासा करावा आमची मागणी जो पर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे शिंदवणे गावचे सरपंच अण्णा महाडिक आणि माजी सरपंच गणेश महाडिक म्हणाले आहेत (अण्णा महाडिक बाईट)यावेळी नागरिक चांगलेच आक्रमक दिसून आले असून pwd च्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. अण्णा महाडिक यांच्या उपोषणाला पुरंदर-हवेलीतून पाठिंबा.

Previous articleग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषदेमध्ये स्विकृत सदस्यांची निवड करण्याची आनंद वैराट यांची आमदार अशोक पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी
Next articleटिळेकरवाडी येथे शेतकऱ्यांना मोफत सातबारा उताऱ्यांचे वाटप