टिळेकरवाडी येथे शेतकऱ्यांना मोफत सातबारा उताऱ्यांचे वाटप

अमोल भोसले,उरुळी कांचन

टिळेकरवाडी येथे महसूल विभागाचे डेप्युटी कलेक्टर संजय तेली यांच्या शुभहस्ते येथे शेतकऱ्यांना मोफत सातबारा वाटप करण्यात आले.

यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र टिळेकर यांच्या शुभहस्ते डेपोटी कलेक्टर संजय तेली यांचा सत्कार करण्यात आला. महसूल खात्यातील अनेक विषयावर तेली यांनी माहिती दिली. कुळ कायदा इनाम वतन महार वतन पोटखराबा अशा अनेक जमिनीवर बाबत असलेल्या अडचणी बद्दल माहिती दिली. व त्यांनी गावातील विकास कामे पाहून ग्रामस्थांचे कौतुक केले. ग्रामस्थांच्या वतीने सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी सर्कल नूरजहाँ सय्यद अव्वल कारकून जितेंद्र पाटील तलाठी जवळकर, तलाठी गवारी, तलाठी जायभाई, योगेश पवार, श्रीदत्त सेवा ट्रस्टचे संतोष टिळेकर, उपाध्यक्क्ष आबासाहेब टिळेकर, पोलीस पाटील विजयराव टिळेकर, माजी सरपंच शांताराम टिळेकर, विकास टिळेकर, मा उपसरपंच प्रेमजी थोरात, जयप्रकाश टिळेकर, रवींद्र लोणकर, गणेश टिळेकर, अक्षय टिळेकर, संतोष राऊत, राजेंद्र टिळेकर, बबनराव टिळेकर आदी शेतकरी व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

Previous articleरस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिंदवणे गावाच्या नागरिकांचे उपोषण
Next articleडॉ.बाबासाहेबांचे नाव घेऊन राजकारण करण्यापेक्षा संविधानाला अभिप्रेत कार्य करा – प्रा. बाळकृष्ण काकडे