नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचणे आवश्यक- पै.संदीप भोंंडवे

अमोल भोसले,उरुळी कांचन

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या माध्यमातून पक्षाचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचणे आवश्यक आहे. उद्याच्या जिल्हा परिषद -पंचायत समितीच्या निवडणूक मध्ये परिवर्तन घडवून आले पाहिजे हि आपल्या सर्वाची जबाबदारी असल्याचे मत हवेली तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष पै.संदीप भोंडवे यांनी व्यक्त केले.

भाजपा व्यापारी आघाडी हवेली तालुका उपाध्यक्षपदी तुषार उत्तम टिळेकर यांची तर अमोल पोपट टिळेकर यांची भाजपा ओबीसी मोर्चा उरुळी कांचन शहर उपाध्यक्षपदी तर अमित महादेव तुपे भाजपा उरुळी कांचन शहर सरचिटणीसपदी, निखिल सुरेश चोरडिया उरुळी कांचन शहर व्यापार आघाडी अध्यक्षपदी निवड झाली झाली आहे.

निवडीचे पत्र हे भारतीय जनता पार्टीचे हवेली तालुका अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, भारतीय जनता पार्टीचे पुणे ज़िल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष सुनिल कांचन, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र व्यापारी विभागाचे अध्यक्ष विकास जगताप, भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी, क्षेत्रीय रेल्वे समितीचे सदस्य अजिंक्य कांचन, जिल्हा सहकोषाध्यक्ष श्रीकांत कांचन, माजी ग्रामपंचायत सदस्या सारिका लोणारी, शहर अध्यक्ष अमित कांचन, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नीलेश कानकाटे, सांस्कृतिक विभाग तालुका अध्यक्ष सुनिल तुपे, शहर विद्यार्थी अध्यक्ष ऋषीकेश शेळके, शहर सोशल मीडिया अध्यक्ष शुभम वलटे, ओबीसी तालुका अध्यक्ष जयेश जाधव, कविता खेडेकर, पूजा सणस, सुवर्णा कांचन, ऋषी ढवळे, भाऊसाहेेेब कांंचन, गुुुरुनाथ मचाले, अभिजित महाडिक, शुभम टिळेकर, अजिंक्य कांचन, ओंकार कांचन, आशुतोष तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleजुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे यांचा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल
Next articleजुन्नरला अवकाळीचा धुमाकूळ; २०० पेक्षा जास्त मेंढ्यांचा मृत्यू