खोडद, हिवरे तर्फे नारायणगाव येथील ग्रामस्थ व नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांची बैठक

नारायणगाव, किरण वाजगे

नारायणगाव बाह्यवळण रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे अनेक लोक जखमी होऊन नुकताच एका महिलेचा अपघाती मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या हिवरे तर्फे नारायणगाव, खोडद गावच्या ग्रामस्थांनी शुक्रवार (दि. २६ ) रोजी रस्ता रोको आंदोलन करत बाह्यवळण रस्ता बंद केला होता.
याच पार्श्वभूमीवर नारायणगाव पोलीस ठाण्यातील सभागृहामध्ये स्थानिक ग्रामस्थ प्रकल्प अधिकारी तसेच प्रशासनाचे अधिकारी यांच्यात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया एन एच ए आय चे अधिकारी सुहास चिटणीस, तहसीलदार रविंद्र सबनीस, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांच्या सह जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, विघ्नहर चे संचालक संतोष नाना खैरे, मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे, राष्ट्रवादीचे तालुका युवक अध्यक्ष सूरज वाजगे, खोडद गावच्या सरपंच सविता गायकवाड, सरपंच सोमेश्वर सोनवणे ग्रामस्थ अवधूत खरमाळे, विकास भोर, दिगंबर भोर,खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे स्वीय सचिव प्रबोध सावंत, तेजस झोडगे, इंद्रभान गायकवाड, राजेश कोल्हे मुकेश वाजगे, गौतम औटी, जुबेर शेख, सुहास थोरात, अभय वाव्हळ, महेश शेळके, धुंडिराज थोरात, तानाजी तांबे, तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी चिटणीस यांनी लवकरात लवकर भुयारी मार्ग कसा होईल यासाठी प्राधान्याने प्रयत्न केला जाईल, तसेच सुरक्षा विषयक सर्व कामे तात्काळ सुरु करण्यात येतील असे सांगितले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी बाह्यवळण रस्त्यात अनेक कामे अपूर्ण असल्याचे सांगत प्रसंगी मी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन या कामाचा पाठपुरावा करील असे आश्वासन दिले. पोलिस अधिकारी मंदार जवळे तहसीलदार रवींद्र सबनीस पोलीस निरीक्षक विलास देशपांडे तसेच ग्रामस्थां पैकी अवधूत खरमाळे, सरपंच सविता गायकवाड, मनिषा भोर, संतोषनाना खैरे, इंद्रभान गायकवाड, मुकेश वाजगे, मकरंद पाटे, सुरज वाजगे, यांनी चर्चेत सहभाग घेतला.

दरम्यान नारायणगाव बाह्यवळण रस्ता हा तोपर्यंत सुरू होणार नाही जोपर्यंत प्रत्यक्षात भुयारी मार्गाचे काम सुरु होत नाही असा पवित्रा बैठकीत असलेल्या खोडद व हिवरे गावच्या ग्रामस्थांनी घेतला.यावर तोडगा काढत येत्या चार तारखेपर्यंत स्पीड ब्रेकर तसेच साईन बोर्ड ची उर्वरित कामे करावीत व त्यानंतर जोपर्यंत भुयारी काम पूर्ण होत नाही तोपर्यंत संपूर्ण बाह्यवळण रस्त्याची एकच बाजू सुरू ठेवावी. अशी भूमिका जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी घेतली व काहीसा झालेला वाद मिटला.

Previous articleपिकअपच्या धडकेत दोन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Next articleखोडद चौकातील हायमास्ट दिव्यांचे काम युद्धपातळीवर करुन हायमास्ट दिवे सुरू