पिकअपच्या धडकेत दोन महिला वारकऱ्यांचा मृत्यू

मावळ : संत ज्ञानेश्वर माऊली संजीवनी समाधी निमित्त आळंदीला पायी जाणाऱ्या माऊली कृपा चॅरिटेबल ट्रस्ट उंबरे (ता. खालापुर) या दिंडीत पिकअप शिरून २५ ते ३० भाविकांना चिरडल्याची दुर्दैवी घटना आज (दि.२७) सकाळी ७ च्या सुमारास घडली आहे. जुना पुणे मुंबई महामार्गावर  साते-कान्हेफाटा येथे हा अपघात झाला.

आळंदीला संत ज्ञानेश्वर माऊली यांचा सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी कोकण परिसरातील अनेक दिंड्या मुंबई-पुणे महामार्गावरुन जात होत्या. परंतु आज सकाळी ७ च्या सुमारास एक मद्यधुंद पिकअप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पिकअप थेट पायी जाणाऱ्या दिंडीमध्ये घुसला.दोन महिला वारकऱ्या़ंचा मृत्यू तसेच २५ ते ३० महिला चिरडल्या गेल्या आहे. जखमींना बडे हॉस्पिटल, मुथा हॉस्पिटल, कान्हे ग्रामीण रुग्णालय, स्पर्श हॉस्पिटल, पवना हॉस्पिटल आदी हॉस्पिटलमध्ये उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर वाहन चालकाला वडगाव मावळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

Previous articleराज्यात अनैतिक युती करून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं -वासुदेव काळे ,प्रदेश अध्यक्ष भाजपा किसान मोर्चा
Next articleखोडद, हिवरे तर्फे नारायणगाव येथील ग्रामस्थ व नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांची बैठक