जुन्नर तालुक्यात आज ४७५ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३३० रुग्ण बरे होऊन घरी

तालुक्यात आज १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४७५ एवढी वाढली असताना आज पर्यंत ३३० कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण पूर्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ही दिलासादायक बातमी आहे.दरम्यान आज तालुक्यामध्ये एकूण १२ पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत.

आजपर्यंत जुन्नर तालुक्याची एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांंची संख्या ४७५ एवढी झाली असून आजपर्यंत २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  यापैकी ३३०  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १२५  एवढी आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश गोडे व डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.

आज आळे ,ओतूर उंचखडक येथे प्रत्येकी दोन रुग्ण
तरपारुंडे, शिंदेवाडी – वरूंडी, शिरोली तर्फे आळे,
कांदळी ,वारुळवाडी,बेल्हे येथे प्रत्येकी एक असे आज एकूण १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान सर्वांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे. बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहे. प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे सर्वांनी काटेकोर पालन करावे असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने वारंवार केले जात आहे.

Previous articleखासदार अमोल कोल्हे यांच्याकडून मेदनकर कुटुंबियांचे सांत्वन
Next articleराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने यांना अण्णाभाऊ साठे क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित