खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून मेदनकर कुटुंबियांचे सांत्वन

चाकण– चाकण येथील प्रसाद सुरेश मेदनकर यांचे नुकतेच  दुर्देवी निधन झाले.आज या कुटूंबाची शिरुर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी भेट घेऊन कुटूंबातील सदस्यांचे सांत्वन करुन त्यांना सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी या चाकण परिसरातील युवा उदयोजक व पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोत्रे हे देखील खासदारांसमवेत उपस्थित होते .

घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने मेदनकर हा परिवार पोरका झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी , ०१ मुलगा , ०१ मुलगी आणि नातेवाईक असा परिवार असून मोठी मुलगी ही कु.संस्कृती असून तिने नुकतेच कंम्प्युटर इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केलेले असून लहान मुलगा कु. हर्षद हा इ.०७ वी इयत्तेत शिक्षण घेत आहे. मुलाच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वतः श्री. गणेश बोत्रे यांनी स्विकारली तर संस्कृती ला चांगली नोकरी देण्याचे आश्वासन अमोल कोल्हे यांनी दिले

Previous articleभोसे येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित सदगुरू बापुसाहेब मिटकर मॉडर्न विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के
Next articleजुन्नर तालुक्यात आज ४७५ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३३० रुग्ण बरे होऊन घरी