मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाला जेष्ठ नेते शरद पवार उपस्थित राहणार

अमोल भोसले,उरुळी कांचन

मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन या ठिकाणी डिसेंबर महिन्यात पार पडणार आहे. देश व राज्यभरातील सुमारे दोन हजाराहून अधिक पत्रकार बांधव या दोन दिवसीय अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने आज बारामती येथील गोविंदबाग या जेष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी पवार यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांशी पवारांनी अधिवेशना बाबत सविस्तर चर्चा केली. अधिवेशनाला उपस्थित राहण्याबाबत अनुकूलता दर्शवली. शिरुरचे खासदार डॉ अमोल कोल्हे या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत.

यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, कार्याध्यक्ष शरद पाबळे, जिल्हा समन्वयक सुनील जगताप, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे, बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी व यजमान हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळभोर उपस्थित होते.

Previous articleसागर कांचन यांचे कार्य कौतुकास्पद- खासदार.डॉ अमोल कोल्हे
Next articleदौंड महाविद्यालयात लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद