सागर कांचन यांचे कार्य कौतुकास्पद- खासदार.डॉ अमोल कोल्हे

अमोल भोसले,उरुळी कांंचन

समाजात सामाजिक विधायक काम करत असताना निश्चितच समाज तुमच्या कामाची दखल घेऊन तुम्हाला राजकारणात योग्य वेळी योग्य संधी देत असतो. त्यामुळे काम करत असताना चढ उतार येत असतात खचून न जाता आपण आपल काम करत राहायचे. या परिसरात सागर आबा कांचन यांचे कार्य खरंच कौतुकास्पद आहे कोरोनाच्या काळात अनेकांना जीवनावश्यक किराणा किटच्या वाटप यांच्या माध्यमातून झाले असे अनेक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले असे मत शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार संसदरत्न डॉ अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे, जानाई डेव्हलपर्सचे चेअरमन सागर कांचन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जगदंबा प्रतिष्ठानच्या वतीने मोफत कोविड लसीकरण ६०० नागरिकांनी घेतले व भव्य रक्तदान शिबिर मध्ये ४१४ रक्त बाटल्या संकलन झाल्या तसेच मोफत आरोग्य तपासणी, आयुष्यमान भारत योजना कार्ड वाटप, मोफत शालेय वस्तू वाटप, ई श्रम योजना कार्ड वाटप या कार्यक्रमाचे उदघाटन खासदार डॉ अमोल कोल्हे तथा शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार अशोक पवार, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, पिडिसी चेअरमन रमेश थोरात, कॉगेस प्रदेश उपाध्यक्ष देविदास भन्साळी, जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर, तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी मनोगत व्यक्त करुन सागर कांचन यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन राबविण्यात आलेल्या विधायक स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र बडेकर यांनी केले.ग्रामपंचायत सदस्य मयुर कांचन, युवा नेते संदिप गव्हाणे, सुभाष बगाडे सह मित्रपरिवार यांनी आलेल्या मान्यवरांसह नागरिकांचे स्वागत केले.

याप्रसंगी आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन रमेश थोरात, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश घुले, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदिप गारटकर, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, जिल्हा उपाध्यक्ष नंदु काळभोर, हवेली ता.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास भन्साळी, माजी संचालक राजाराम कांचन, मणिभाई देसाई पतसंस्था अध्यक्ष राजेंद्र कांचन, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, माजी सभापती योगीनी कांचन, महिला जिल्हा अध्यक्षा भारती शेवाळे, तालुका महिला अध्यक्ष सुरेखा भोरडे, सरपंच संतोष कांचन, सरपंच विठ्ठल शितोळे, उपसरपंच संचिता कांचन, रा.कॉगेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र बडेकर, माजी सरपंच आण्णा महाडिक, सरपंच सुरज चौधरी, तालुका युवक अध्यक्ष योगेश शितोळे, अजिंक्य कांचन, भाऊसाहेब कांचन, दत्तात्रय शांताराम कांचन, बापुसाहेब बोधे, शरद वनारसे, कांतीलाल काळे, सुभाष टिळेकर, रोहिदास टिळेकर, रामदास चौधरी, रामभाऊ तुपे, सुनिल दत्तात्रय कांचन, सुनिल तांबे, बाबासाहेब फराटे, अलंकार कांचन, मा.सदस्य सागर कांचन, ग्रामपंचायत सदस्य मयूर कांचन, संदीप गव्हाणे, सुभाष बगाडे, आबासाहेब टिळेकर, राजु भाटे, सुनिल गोते आदी मान्यवर उपस्थित होते. सागर आबा कांचन यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. सागर कांचन यांचे कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष टिळेकर यांनी केले तर आभार कार्यक्रमाचे आयोजक सागर कांचन यांनी मांडले.

Previous articleमराठी पत्रकार परिषद ही केवळ पत्रकार संघटना नसून ‘पत्रकारांचे कुटुंब’ आहे – एस एम देशमुख
Next articleमराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाला जेष्ठ नेते शरद पवार उपस्थित राहणार