स्वच्छ भारत अभियानाच्या जुन्नर तालुका अध्यक्षपदी नामदेव खैरे यांची निवड

नारायणगाव ( किरण वाजगे )

स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाव-बेटी पढाव, तसेच सँल्युट तिरंगा अभियान जुन्नर तालुका अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पांडुरंग खैरे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धनंजय दगडे पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीत नामदेव अण्णा खैरे यांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी जुन्नर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

यावेळी उपाध्यक्षपदी बापू हांडे, सरचिटणीसपदी शंकर शिंदे, चिटणीसपदी गोविंद मोडक यांची निवड करण्यात आली. यावेळी सदस्यपदी रेश्मा कटके, वैशाली हांडे, सुनील गाडगे, सुनील शहा, मुक्ताजी दाते, विष्णू काठे या सर्वांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धनंजय दगडे पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

भविष्यात ग्रामपंचायत पातळीवर केंद्र शासनाकडून आलेल्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे होत आहे का, त्याच बरोबर भविष्यातील स्वच्छतेबाबत नियोजनाचे काम व्यवस्थित करण्यात येते का, याबाबतची चौकशी करण्याचे अधिकार समिती करणार असून एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये जर त्रुटी आढळल्यास त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवून केंद्र शासनापर्यंत पोहोचवला जाईल अशी माहिती नवनियुक्त तालुका अध्यक्ष नामदेव अण्णा खैरे यांनी दिली.खैरे यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे परिसरात अभिनंदन करण्यात येत आहे.

Previous articleआदिनाथ थोरात यांचा मुख्याध्यापक संघाच्या वतीने गौरव पत्र देऊन सन्मान
Next articleविघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्यावतीने दर मंगळवारी महाआरतीचा संकल्प