विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्यावतीने दर मंगळवारी महाआरतीचा संकल्प

 

नारायणगाव : ( किरण वाजगे )

श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष गणेशभाऊ कवडे यांनी केलेल्या आवाहनानुसार दर मंगळवारी महाआरती चा संकल्प करण्यात आला आहे.

देवस्थान ट्रस्टने या नवीन उपक्रमाची सुरुवात केली असून प्रत्येक मंगळवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्याचा संकल्प देवस्थान ट्रस्टचा आहे. या संकल्पासाठी आज (दि. १२) रोजी पहिल्या महाआरतीचे मानकरी खेडचे उद्योजक बाळासाहेब सांडभोर, उद्योजक संतोषभाऊ शिंदे, उद्योजक सुरेशभाऊ भोर, उद्योजक सागरशेठ मुऱ्हे, उद्योजक राहुलशेठ कुंभार या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.


या महाआरतीस देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे, सचिव दशरथ मांडे, विश्वस्त बी.व्ही.मांडे, आनंदराव मांडे, गणपत कवडे, व्यवस्थापक गणेश टेंभेकर, देवस्थान ट्रस्ट चे कर्मचारी ओझर मधील ग्रामस्थ,महिला भगिनी उपस्थित होते.

याप्रसंगी श्री विघ्नहार देवस्थान ट्रस्ट च्या विकासकामांसाठी बाळासाहेब सांडभोर यांनी २१०००/- व संतोष शिंदे यांनी ५०००/- रूपये देणगी दिली.

Previous articleस्वच्छ भारत अभियानाच्या जुन्नर तालुका अध्यक्षपदी नामदेव खैरे यांची निवड
Next articleअंबिका विद्यालयात शालेय साहित्याचे वाटप