आदिनाथ थोरात यांचा मुख्याध्यापक संघाच्या वतीने गौरव पत्र देऊन सन्मान

दिनेश पवार,दौंड

दौंड तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने ( दि.९) रोजी सिध्देश्वर माध्यमिक विद्यालय, देऊळगाव राजे (ता.दौंड) चे प्राचार्य व महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबईचे सचिव आदिनाथ थोरात यांना मा. आमदार दत्तात्रय सावंत, मा. सभापती आप्पासाहेब पवार यांच्या हस्ते गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.हा सन्मान थोरात यांच्या कार्य,कर्तृत्वाची दखल घेवून प्रदान करण्यात आला.


यावेळी पंचायत समिती दौंड चे उपसभापती विकास कदम, महामंडळाचे अध्यक्ष अरुण थोरात, विश्वस्त शिवाजीराव किलकिले, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, दत्ताजी शिणोलीकर, उल्हास मिसाळ, शालिनी पवार ,पायल भंडारी , प्रसाद गायकवाड, रामचंद्र म्हेत्रे, दादासाहेब नांदखिले, राजेंद्र थोरात, मारुती गायकवाड, विनायक सुंबे, तसेच तालुक्यातील बहुतांशी मुख्याध्यापक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव रामचंद्र नातु यांनी केले.

Previous article१९७५ साली एसएससी मध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन
Next articleस्वच्छ भारत अभियानाच्या जुन्नर तालुका अध्यक्षपदी नामदेव खैरे यांची निवड