शिरुर येथील युवा उद्योजक आदित्य चोपडा हत्येच्या निषेधार्थ वाघोलीत कँडल मार्च

आरोपींना लवकरात लवकर अटक करून योग ती कायदेशीर कारवाई व्हावी : श्री.जैन श्रावक संघ

वाघोली येथे पोलीस प्रशासनास देण्यात आले निवेदन

गणेश सातव, वाघोली

शिरुर येथील तरुण बांधकाम व्यावसायिक आदित्य चोपडा याची काही दिवसांपूर्वी अपहरण करुन अमानुषपणे हत्या करण्यात आली.त्यानंतर बरेचं दिवस उलटूनही अद्यापपर्यंत घटनेतील आरोपींचा तपास लागत नाही.सदर संवेदनशील घटनेचा योग्य तपास व्हावा व घटनेतील सर्व आरोपींना अटक होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी वाघोली येथे श्री. जैन श्रावक संघाच्यावतीने कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते.

वाघोली येथील पुणे-नगर महामार्गालगत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सुरुवात झाली.केसनंद फाटा चौकात असणाऱ्या वाघोली पोलीस चौकीपर्यंत कँडल मार्च मार्गस्थ झाला.यावेळी मेनबत्या पेटवून व शांततेतं घोषणा देऊन या निर्दयी घटनेचा निषेध करण्यात आला.

वाघोली श्री.जैन श्रावक संघाच्यावतीने पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले व लवकरात लवकर घटनेतील आरोपींना अटक करुन योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी याबाबतची मागणी करण्यात आली.
यावेळी श्रावक संघाचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व त्याचबरोबर महिला भगिनीही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Previous articleगावठी पिस्तूलासह दोघे जेरबंद
Next articleमराठी पत्रकार परिषदेचे अधिवेशन भव्य – दिव्य होणार -एस एस देशमुख