प्रयागधाम मध्ये आमदार अशोक पवार यांच्या हस्ते डिजीटल ७/१२ चे वाटप

अमोल भोसले,उरुळी कांचन

शेत जमिनीच्या उताऱ्यावर पिकांची नोंद करण्याची पध्दत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेले नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पिक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले जाते. पिकाची रियल टाइम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन आमदार अशोक पवार यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्व शेतक-यांना सुधारीत नमुन्यातील डिजीटल स्वाक्षरीत गाव नमुना नं.७/१२ चे मोफत घरपोच वाटप तसेच महसूल विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ७/१२ वितरण व शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन प्रयागधाम (ता. हवेली) ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात करण्यात आले होते. यावेळी आमदार पवार बोलत होते.

याप्रसंगी हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले, अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे, तालुका कृषी अधिकारी मारुती साळे, उरुळी कांचनच्या मंडल आधिकारी नूरजहाँ सय्यद, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, प्रयागधाम सरपंच ब्रिजमोहन धवन, महात्माजी आतमप्रेमानंद, महात्माजी प्रेमसिंग, महात्माजी आनंद प्रेमकुमार, जेष्ठ नेते रघुनाथ चौधरी, कोरेगावमुळचे सरपंच विठ्ठल शितोळे, नायगावचे सरपंच गणेश चौधरी, पेठचे सरपंच सुरज चौधरी, ग्रामसेवक भारती भुजबळ, गुलाब चौधरी, सुभाष टिळेकर, ज्ञानेश्वर दाभाडे, विजय टिळेकर, दत्तात्रय चौधरी, दत्तात्रय काकडे, अमित चौधरी, भानुदास जेधे, सचिन निकाळजे, युवराज चौधरी, राजेंद्र चौधरी, डॉ देविदास चांदणे, महादेव चौधरी, रामलिंग भोसले, निवृत्ती गवारी, महेश सुरडकर, प्रदिप जवळकर, सुरेश शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleफुलगाव येथील हरी उद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
Next articleगावठी पिस्तूलासह दोघे जेरबंद