फुलगाव येथील हरी उद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

गणेश सातव, वाघोली

पूर्व हवेलीतील फुलगाव येथील हरी उध्दव धोत्रे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष व फुलगावचे माजी सरपंच नारायणराव खुळे यांच्या हस्ते दोनही राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेला हार घालून पूजन करण्यात आले.

शासन नियम व आदेशानुसार सोमवार दि. ४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील शाळा सुरू होत असल्याने विद्यालयाच्या वर्ग खोल्यांची स्वच्छता,शालेय परिसराची स्वच्छ्ता करुन विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली.सोमवारपासून इयत्ता ५ वी ते ८ वी चे वर्ग कोरोनाचे सर्व नियम पाळून सुरू होत आहेत.यासाठी मुख्याध्यापक वाखारे सर व सर्व शिक्षकवृंद यांनी नियोजन केले आहे.

Previous articleयशवंतचे धुराडे पुन्हा पेटणार : आमदार अशोक पवार
Next articleप्रयागधाम मध्ये आमदार अशोक पवार यांच्या हस्ते डिजीटल ७/१२ चे वाटप