जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी रक्तदात्यांसोबत केले रक्तदान

गणेश सातव वाघोली

वाघोली (ता.हवेली) येथे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका विचारात घेऊन पालकमंत्री अजित पवार यांच्या आवहानाला प्रतिसाद देत हवेली तहसील व पंचायत समिती यांच्यावतीने तालुकास्तरीय भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वाघोलीतील सोयरीक गार्डन मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार अँड. अशोकबापू पवार यांच्या हस्ते झाले.

या शिबिरात जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी स्वतः उपस्थित रक्तदात्यांसोबत रक्तदान केले.त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधवराव व ओंकार जाधवराव या पिता-पुत्रांनी देखील एकाच वेळी रक्तदान केले.दिवसभरात एकूण ७५ बँग रक्त संकलन झाले. सदर रक्तदान शिबिर पुणे ब्लड बँक हडपसर यांच्या सहकार्यातून पार पडले.

   या शिबीर प्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख,हवेली उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार तृप्ती कोलते पाटील,अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे,लोणीकंद पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन पवार,माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे,सरपंच वसुंधरा उबाळे,पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब सातव,पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य रामकृष्ण सातव,सुनील जाधवराव,संतुलन संस्थेचे बस्तू रेगे,वाघोली मंडलाधिकारी शिंदे,तलाठी बाळासाहेब लाखे,वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. नागसेन लोखंडे,आशा वर्कर,पत्रकार बांधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleजिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी रक्तदात्यांसोबत केले रक्तदान
Next articleदावडीच्या सरपंचाने दिली गावासाठी रुग्णवाहिका