वाघोलीत तहसील व पंचायत समिती हवेलीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन

गणेश सातव,वाघोली

हवेली तहसील कार्यालय व पंचायत समिती,हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने आज वाघोली येथेली सोयरिक गार्डन मंगल कार्यालयात तालुकास्तरीय भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी १० वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत हे शिबीर पार पडणार आहे.

सकाळी १० वाजता या शिबीराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुश प्रसाद यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी शिरुर-हवेली मतदारसंघाचे आमदार अँड.अशोकबापू पवार,हवेली उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या तालुकास्तरीय रक्तदान शिबीरात कोरोना महामारीचे सर्व नियम पाळून नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवहान हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील,अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे व गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी केले आहे.

Previous articleअशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली पेरणे वाडेबोल्हाई जिल्हा परिषद गटात कार्यकर्ता आपल्या दारी उपक्रम
Next articleउरळी कांचन येथे १८ आणि १९ डिसेंबरला मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन – एस.एम.देशमुख