अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली पेरणे वाडेबोल्हाई जिल्हा परिषद गटात कार्यकर्ता आपल्या दारी उपक्रम

अमोल भोसले,उरुळी कांचन

शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या संकल्पनेतून जलदगतीने नागरिकांचे समस्या निवारण उपक्रम अंतर्गत पेरणे वाडेबोल्हाई जिल्हा परिषद गटातील २१ गावातील सामाजिक प्रश्न व जनतेच्या वैयक्तिक समस्या यासंदर्भातचे निवेदन स्वीकारुन त्या सोडवण्यासाठी कार्यकर्ता आपल्या दारी हा उपक्रम महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रदिप वसंत कंद यांनी सांगितले . शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील सर्व सामान्य तळागाळातील घटकांन पर्यंत व्हावा तसेच विविध प्रश्नांची सोडवणूक प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने व्हावी यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरु केला. मात्र कोविड प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

गुरुवार दि.२३/९/२०२१ रोजी
वाडेबोल्हाई सकाळी ९ वा., शिरसवडी सकाळी १० वा., बिवरी सकाळी ११ वा.,अष्टापूर १२ वा., हिंगणगाव दुपारी १ वा., शिंदेवाडी दुपारी २ वा., न्हावी सांडस दुपारी ४ वा., सांगवी सांडस सायं. ५ वा.

तर शुक्रवार दि. २४ / ९ / २०२१
रोजी तुळापूर सकाळी ९ वा., फुलगाव सकाळी १० वा., वढु सकाळी ११ वा., लोणीकंद सकाळी १२ वा., पेरणे दुपारी १ वा., डोंगरगाव दुपारी २ वा., बुर्केगाव दुपारी ३ वा., पिंपरी सांडस दुपारी ४ वा., बकोरी सायं. ५ वा.

यावेळी हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश शितोळे, हवेली तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा लोचन शिवले सह प्रशासकीय अधिकारी, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, आपल्या गावात उपस्थित राहणार आहेत.

Previous articleनारायणगाव ग्रामपंचायतीच्या कचरा गाडीत आढळला माणसाचा पाय
Next articleवाघोलीत तहसील व पंचायत समिती हवेलीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन