श्री क्षेञ महाळुंगे-श्री समर्थ सदगुरु श्रीपती बाबा महाराज यांना अभिवादन 

चाकण- श्री क्षेञ महाळुंगे येथे संत श्री समर्थ सदगुरु श्रीपती बाबा महाराज यांची पुण्यतिथी दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाती परंतु गेल्यावर्षा पासून कोरोना च्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने फक्त पुजाऱ्यांच्या उपस्थित पुष्पवृष्टी व सोहळा साजरा करण्यात आला दरवर्षी प्रमाणे होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. मंदिर बंद असल्याने भक्तगणांना यावर्षी कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. बाबा महाराजांच्या भक्तगणांनी  यावर्षी  पुण्यतिथी सोहळा घरच्या घरीच साजरा केला

श्री समर्थ सदगुरु श्रीपती बाबा महाराज यांचे श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते

खुप मोठ्या संख्येने भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेत असतात. परंतु शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून सोशल डिस्टंसिंग व मास्क लावून पुजाऱ्यांनी पुण्यतिथी सोहळा साजरा केला प्रथमच इतिहासात भक्तां विना पुण्यतिथी सोहळा  साजरा करावा लागतो याची खंत देवस्थानचे पुजारी यांनी व्यक्त केली

 ज्यांच्या पविञ अश्या पदस्पर्शाने व अंखड आध्यात्म्याने पावन झालेल्या महाळुंगे नगरीत घरोघरी बाबांचे नामस्मरण करण्यात आले सर्व भाविक भक्ती रसात दंग झाले होते. बाबांनी लावलेल्या रोपाचे आज मोठा वटवृक्ष झाल्याची जाणीव सर्वांना झाली. बाबांनी सव्वाशे वर्षापूर्वी  मंदीरा मध्ये चालु केलेला कार्तिक वारी सोहळा व अंखड विणा, काकडा, आज ही तेवढ्या अखंडपणे भक्ती भावाने चालु आहे.

 पुण्यतिथी निमित्त  पहाटे ४ ते ५:३५ निर्वाण पुष्पाचे भजन नामस्मरण करण्यात आले अशाप्रकारे सर्व होणारे कार्यक्रम रद्द करून पुण्यतिथी सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

Previous articleअल्पवयीन मुलीवर बलात्कार, सहा जणांवर गुन्हा दाखल
Next articleआमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिला धामणे शाळेला स्लॅब