उरुळी कांचन – कोरेगावमुळ,टिळेकरवाडीत श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात संपन्न

अमोल भोसले

उरुळी कांचन (ता.हवेली) येथील श्रीकृष्ण मंदिरात रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कोरोनाचे नियम पाळून कोरेगावमुळ (ता.हवेली) श्रीकृष्ण अध्यात्मिक प्रतिष्ठान -श्रीकृष्ण महानुभाव मंदिर व टिळेकरवाडी (ता.हवेली) श्रीदत्त मंदिरात याठिकाणीही जन्मोत्सव साजरा झाला.

पुजा अवसर, आरती, भजन, पाळणा इत्यादी धार्मिक विधी संपन्न झाला नंतर सर्व सदभक्ताना प्रसाद वाटप करण्यात आले.

यावेळी श्रीकृष्ण अध्यात्मिक प्रतिष्ठानचे विश्वस्त महंत विद्यादर शहापूरकर, उरुळी कांचनचे प.पु.सुबोधमुनी धाराशिवकर, प.पु.रविराज पंजाबी, प.पु. अनिल बाबा, माजी उपसरपंच दत्तात्रय कांचन, शरद वनारसे, हरिभाऊ कांचन, पु.जि.नि.स. सदस्य संतोष कांचन, संतोष चौधरी, श्रीकृष्ण अध्यात्मिक प्रतिष्ठान अध्यक्ष विठ्ठल कोलते, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त राजेंद्र टिळेकर, श्रीदत्त मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष टिळेकर, ओबीसी तालुका अध्यक्ष सुभाष टिळेकर, पोलीस पाटील विजय टिळेकर, सोसायटीचे चेअरमन आबासाहेब टिळेकर, माजी चेअरमन शांताराम चौधरी, संजय भोसले, बाबासाहेब चौधरी, राजेंद्र खेडेकर, सुदर्शन कानकाटे, तुकाराम ताटे, बाबासाहेब चौधरी, तुकाराम जगताप, बापु गिरी, बापुु बनकर, राजु भंंडारी, संपत भोरडे, रामभाऊ बोधे, हरिभाऊ बोधे, शंकरराव सोनवणे, राजु गायकवाड, कुलदीप सरडे, रविंद्र कानकाटे आदी सदभक्ताच्या उपस्थितीत श्रीकृष्ण जन्मोत्सव पार पडला.

Previous articleवारूळवाडी व नारायणगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोविड लसीकरण मोहिमेत ३२०० जणांना लस
Next articleतुरूंगात गेला तर कोट्याधीश असून उपयोग नाही- डॉ. श्रीमंत कोकाटे