जुन्नर तालुक्यात आज नव्याने २२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाल्यामुळे एकूण रुग्ण संख्या झाली ३४४

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यामध्ये आज एकूण २२ कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत.यामध्ये जुन्नर येथे सहा, नारायणगाव व पारगाव तर्फे मढ येथे प्रत्येकी तीन रुग्ण, येडगाव व ओतूर येथे प्रत्येकी दोन रुग्ण, गोळेगाव, काळवाडी, उदापूर, निमगाव सावा, बेल्हे व आळे येथे प्रत्येकी एक रुग्ण असे एकूण २२ कोरोना बाधित रूग्ण असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी हेमंत गरीबे यांनी दिली.

आजपर्यंत एकूण ३४४ कोरोणा बाधित रुग्णांपैकी १६५ रुग्ण बरे झाले आहेत. तर दहा जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला असून १६९ एक्टिव रुग्ण उपचार घेत आहेत. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी उमेश गोडे व डॉक्टर वर्षा गुंजाळ यांनी दिली.

कोरोणा बाबत प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून सर्वांनी कोरोना शी मुकाबला करण्यासाठी सज्ज व्हावे अशी सूचना वारंवार प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनी प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करून, “कोरोना मुक्त जुन्नर तालुका” होईल यादृष्टीने वाटचाल करावी. असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleमानव अधिकार संघटनेच्या खेड तालुकाध्यक्षपदी पै.शरदभाऊ जठार यांची निवड
Next articleपूर्व हवेली तालुक्यातील मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान; रस्तेही गेले वाहून