मानव अधिकार संघटनेच्या खेड तालुकाध्यक्षपदी पै.शरदभाऊ जठार यांची निवड

राजगुरुनगर –खेड तालुक्यातील पश्चिम पट्टयातील युवा नेतृत्व नेहमी सर्वाच्या मदतीला धावून जाणारे धुओली गावचे उपसरपंच पै.शरदभाऊ जठार यांची राष्ट्रीय मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण भारत चे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष श्री. रमेश गणगे उपप्रदेश अध्यक्ष. श्री.यशवंत कुंभार सदस्य श्री.धोंडिबा शेठ कटके,सचिव लक्ष्मण सुरवसे तसेच महाराष्ट्राचे युवा प्रदेश अध्यक्ष श्री.बाळासाहेब मदने यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष महेश मीना यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र पाठवले असून संघटनेच्या खेड तालुक्याची कार्याची धुरा त्यांच्याकडे देण्यात आली आहे.

लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे व अन्याय अत्याचार व भ्रष्टाचार विरुद्ध आवाज उठवून पिडीतांना न्याय मिळवून देण्यास मदत करण्याचा त्यांचा मानस त्यांनी प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला.

Previous articleजुन्नर तालुक्यामध्ये कोरोना चे आज सापडले सहा पॉझिटिव्ह रूग्ण;तालुक्याची एकूण संख्या झाली ३२२
Next articleजुन्नर तालुक्यात आज नव्याने २२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाल्यामुळे एकूण रुग्ण संख्या झाली ३४४