पूर्व हवेली तालुक्यातील मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान; रस्तेही गेले वाहून

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन — प्रतिनिधी

पूर्व हवेली मध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे अगोदरच कंबरडे मोडले आहे. यामध्ये जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रंचड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बाजरी, मका, कडवळ, पालेभाज्या, भूईसपाट झाले आहे. काही शेतात पावसाने तळयाचे रुप धारण केले आहे.

पूर परस्थिती निर्माण झाली असल्याने चोहीकडे पाणी – पाणी झाले तसेच काही ठिकाणी रस्तेही खचले व वाहून गेले आहेत. तसेच शेतकऱ्या बरोबर सर्व सामान्य नागरिकांचे देखील प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कारण काही ठिकाणी घरात पावसाचे पाणी शिरले. शेतकऱ्यांचे प्रमुख जोडधंदे असलेले उद्योग धंदे कोरोना महामारीत कर्जबाजारीच्या खाईत गेले आहेत. तरी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करुन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधीनी प्रयत्न करावे अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी वर्गातून होत आहे. महसूल विभाग आणि कृषी विभागास आमदार यांनी पंचनामे करण्यास तातडीने सुचना द्याव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.