जुन्नर तालुक्यामध्ये कोरोना चे आज सापडले सहा पॉझिटिव्ह रूग्ण;तालुक्याची एकूण संख्या झाली ३२२

नारायणगाव ( किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यामध्ये आज एकूण सहा कोरोणा बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यामध्ये ओतूर मध्ये दोन रुग्ण, बारव, जुन्नर, बेल्हे, आळे येथे प्रत्येकी एक रुग्ण असे एकूण सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. अशी माहिती गटविकास अधिकारी हेमंत गरीब आहे यांनी दिली
आजपर्यंत एकूण ३२२ कोरोणा बाधित रुग्णांपैकी १६५ रुग्ण बरे झाले आहेत. तर दहा जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला असून १४४ एक्टिव रुग्ण उपचार घेत आहेत. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी उमेश गोडे व डॉक्टर वर्षा गुंजाळ यांनी दिली

कोरोणा बाबत प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून सर्वांनी कोरोना शी मुकाबला करण्यासाठी सज्ज व्हावे अशी सूचना वारंवार प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनी प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करून *कोरोना मुक्त जुन्नर तालुका* याकडे वाटचाल करावी. असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleविद्युत तारा,मैलापाणी गटारी सुरक्षित ठिकाणी हलवूनच रस्त्याचे काम करा
Next articleमानव अधिकार संघटनेच्या खेड तालुकाध्यक्षपदी पै.शरदभाऊ जठार यांची निवड