विद्युत तारा,मैलापाणी गटारी सुरक्षित ठिकाणी हलवूनच रस्त्याचे काम करा

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

देऊळगाव राजे हद्दीत दौंड सिद्धटेक, अष्टविनायक रस्त्याचे काम सुरू आहे,ठेकेदाराने हे काम पूर्वी रस्त्याच्या कडेने असणारे विद्युत खांब, मैलापाणी वाहून नेणारे गटार यांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था न करताच हे काम सुरू ठेवले होते,आज सकाळी काम सुरू असताना रस्त्याच्या शेजारील खांबाचा ताण तुटल्यामुळे खांब रस्ताच्या दिशेने झुकला,देऊळगाव राजे येथील महावितरण कर्मचाऱ्यांनी तप्तरतेने त्याची दुरुस्ती केली, अन्यथा खूप मोठा अनर्थ घडला असता,तसेच एका ठिकाणी मैलापाणी वाहून नेणारे गटार देखील फुटले,ग्रामपंचायत प्रशासनाने वेळोवेळी संबंधित ठेकेदारास व सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना कळवून देखील याची व्यवस्था न केल्यामुळे आजची घटना घडली,मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला.रस्त्याच्या कडेला असणारे विद्युत खांब,मैलापाणी वाहून नेणारी गटारे यांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था केल्यानंतरच पुढील रस्त्याचे काम सुरू करावे असे संबंधित ठेकेदार यांना सांगितले असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महारुद्र खंबीले यांनी सांगितले.

Previous articleव्यंकय्या नायडूंना पत्र पाठवण्यासाठी राष्ट्रवादी युवकांच्या पोस्ट आँफिसच्या बाहेर रांगा
Next articleजुन्नर तालुक्यामध्ये कोरोना चे आज सापडले सहा पॉझिटिव्ह रूग्ण;तालुक्याची एकूण संख्या झाली ३२२