Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
नारायणगाव (किरण वाजगे)
नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा.प. सबनीस विद्यामंदिरामध्ये सावित्रीबाई फुले व गुरुवर्य रा. प. सबनीस दत्तक पालक योजना, लायन्स क्लब ऑफ शिवनेरी, नारायणगाव आणि वारूळवाडी येथील दातृत्ववान ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यामंदिरातील गरीब होतकरू व गरजवंत विद्यार्थ्यांसाठी धान्य व किराणामाल वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
विद्यामंदिरातील १८० विद्यार्थ्यांना गहू, तांदूळ, बाजरी, बेसन पीठ, पोहे, तेल, साखर, मीठ इत्यादी वस्तुंचे किराणा कीट वाटप करण्यात आले अशी माहिती मुख्याध्यापक रवींद्र वाघोले यांनी दिली.

याप्रसंगी देणगीदार विलास पाटे, अशोक खांडगे, आनंद कोठारी, स्मिता कोठारी,वैभव मुथा, गणेश देशमुख,जितेंद्र गुंजाळ,लायन्स क्लबचे अध्यक्ष मिलिंद झगडे, बंडू कर्पे, डॉ.कल्पना डुंबरे, पालक संघाचे पदाधिकारी परशुराम वारुळे, मनोहर वायकर, संदीप भुजबळ, अनिल घोडेकर, माजी सैनिक किसन ढवळे, चंद्रकांत मुळे, वनिता डेरे, योगिता गावडे, पालक संघाचे सचिव मेहबूब काझी, दत्तक पालक योजना प्रमुख राहुल नवले, काशिनाथ आल्हाट, सुभाष दुबळे, अनुपमा पाटे, सविता ताजणे, वृषाली वाघ, वनिता जगताप, सुनीता लांभाते आदी मान्यवर उपस्थित होते.

लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये वाढलेली बेरोजगारी,आर्थिक विवंचना यामुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना धान्य व किराणा साहित्याचे वाटप करावे असे पालक संघाने निश्चित करून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती मुख्याध्यापक वाघोले यांनी दिली.
याप्रसंगी प्रमुख देणगीदार विलास पाटे, लायन्स क्लब चे अध्यक्ष मिलिंद झगडे,गणेश देशमुख, वैभव मुथ्था, मनोहर वायकर, यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशिनाथ आल्हाट यांनी केले व आभार राहुल नवले यांनी मानले.
Download WordPress Themes Nulled and plugins.