पोलिस उपनिरीक्षकावर दरोड्याचा गुन्हा दाखल

चाकण- चोरांशी हात मिळवणी करून  चोऱ्या करणाऱ्या चाकण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या महाळुंगे पोलीस चौकीतील एका पोलिस उपनिरीक्षकावर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.गुन्हा दाखल होताच विक्रम चंद्रकांत पासलकर हा पोलिस उपनिरीक्षक फरार झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चाकण परिसरातील रोहकल येथे एका कटेंनरमधून टाटा कंपनीचे स्पेअर पार्ट व १५०० रू रोख रक्कम असा एकुण २७.१०,९६१/- रू. किंमतीचा माल मोटारसायकलवरून आलेल्या चौघांनी चोरून नेला होता. याबाबत चाकण पोलीस स्टेशनमध्ये दरोड्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्हयाचा तपास करत असताना चाकण पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतले होते. त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

विक्रम पासलकर याने हा गुन्हा कसा करायचा व दरोड्याच्या मुददेमालाची विल्हेवाट कशी व कोठे लावायची अशी दरोडयाची आखणी केली होती तसेच आरोपी बरोबर गुन्हा घडण्याच्या पुर्वी व गुन्हा घडल्यानंतर मोबाईलवर बोलणे झाले असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. गुन्ह्याची उकल झाल्यानंतर पासलकर हा फरार झाला असून त्यांचा शोध चालु आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कुष्ण प्रकाश,अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्त सुधिर हिरेमत, सहा. पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस कर्मचारी यांनी केलेली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक विजय जगदाळे हे करीत आहेत.

Previous articleपुणे शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाबासाहेब तारे यांची निवड
Next articleसबनीस विद्यालयात गरजवंत विद्यार्थ्यांना किराणा साहित्याचे वाटप