गावरवाडी येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते संपन्न

आंबेगाव – मोसीन काठेवाडी

राज्याचे सहकारमंत्री मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून डोंगरी विकास अंतर्गत गावरवाडी (ता. आंबेगाव ) येथे नवीन अंगणवाडी इमारत बांधणे ( रु.१२.५० लक्ष), जि.प.शाळा ते स्मशानभूमी रस्ता करणे ( रु.१०.०० लक्ष ) या विविध विकासकामाचे भूमीपूजन आज पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील , माजी सभापती कैलासबुवा काळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ काळे , शरद बँकेचे संचालक सुदामराव काळे, तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक वैभवशेठ काळे ,घोडेगाव माजी लोकनियुक्त आदर्श सरपंच क्रांतीताई गाढवे,गणेश काळे सर, गोविंद भास्कर , युवा नेते विनायक काळे,आंजली आंधळे,माधवी कर्पे, उदयोजक महेश काळे, ज्येष्ठ नेते विजय काळे सर,काळेवाडी -दरेकरवाडी ग्रुप गावरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच मंजुषा बोऱ्हाडे, उपसरपंच मंगल जैद,मनिषा संतोष काळे,धनश्री पोखरकर,अर्जुन फदाले,निलम गावडे,शैला गावडे,सिताराम काळे सर्व ग्रामपंचायत सदस्य,सतीश गावडे,बाबू पोखरकर,गणेश फदाले, रोहित पोखरकर, योगेश पोखरकर , दिपक पोखरकर, अशोक गावडे, विनायक गावडे, रस्त्याचे कॉन्ट्रक्टर राहुल गोसावी , अंगणवाडी इमारत बांधकाम कॉन्ट्रक्टर किशोर गावडे तसेच स्थानिक ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होते.

Previous articleपाटस व्यापारी संस्थेकडून भव्य दिव्य व्यावसायिक मार्गदर्शन मेळावा
Next articleनारायणगाव बाह्यवळण मार्गावरील खोडदरोड चौकात शिवशाही बसला अपघात