राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत उत्कर्ष शिंदे , पायल पारखी यांना सुवर्णपदक

योगेश राऊत ,पाटस

ऑल महाराष्ट्र स्टेट किंक बॉक्सिंग स्पर्धा राजाराम भिकू पठारे स्टेडियम खराडी पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून बाराशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता अशी माहिती पुणे जिल्हा किक बॉक्सिंग मार्शल आर्ट उपाध्यक्ष प्रा. कैलास महानोर यांनी दिली दौंड तालुक्यातून कदम पाटील स्कूल राहू येथील विद्यार्थिनींनी दोन सुवर्णपदक पटकाविले.

कु. उत्कर्षा रणजीत शिंदे 28 किलो सुवर्णपदक ,कु.पायल शशिकांत पारखी 63 किलो सुवर्णपदक या किक बॉक्सिंग खेळाडूंचे अभिनंदन कदम पाटील स्कूलचे चेअरमन श्री लक्ष्मणराव कदम पाटील प्राचार्य मार्था मॅडम यांनी केले या किक बॉक्सिंग खेळाडूंची नॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी रांची झारखंड या ठिकाणी निवड करण्यात आली आहे
या खेळाडूंना मार्गदर्शन प्रा. कैलास महानोर, श्री.स्वप्निल भागवत ,नक्षत्रा महानोर यांनी मार्गदर्शन केले आहे.

Previous articleपाटस भानोबानगरमध्ये डोळे तपासणी शिबिर संपन्न
Next articleदौंड तालुक्यातील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला वीस वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा