खा.कोल्हे यांनी क्रांती दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

नारायणगाव (किरण वाजगे)

संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून क्रांती दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘रक्तदान शिबीरात १२२ जणांनी सहभाग घेतला. नारायणगाव येथे मुक्ताई हॉलमध्ये आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
नारायणगाव आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्याप्रमाणात या रक्तदान शिबिराचा लाभ घेतला. सोबतच रक्तदान करणार्‍या प्रत्येक रक्तदात्यास ६ लाखांचे सुरक्षा कवच व प्रमाणपत्र आमदार बेनके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमाला विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली यामध्ये युवा नेते अमित बेनके, मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ शेटे,अशोक पाटे, सुरज वाजगे, गणेश वाजगे, रोहिदास केदारी, तानाजी डेरे, विलास पाटे, विठ्ठल औटी, दुर्गाशेठ बेल्हेकर, शंकरराव कोल्हे, तानाजी वाजगे, रमेश मेहेत्रे, राजेंद्र कोल्हे, रामदास अभंग, सागर दरंदळे, संजय फल्ले, किरण कुमार ढवळपुरीकर, अजित वाजगे, शशिकांत वाजगे, अनिल थोरात,रामदास पाटे स्वप्निल डेरे,पप्पु रसाळ,अरुण पाटे,शंकर जाधव, माछिन्द्र डोके, अतुल आहेर,नितीन कोल्हे, संदेश केदारी, तुळशीदास कोऱ्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी ग्रामपंचायत सदस्य रामदास भाऊ यांनी केले . उपस्थित मान्यवरांचे आभार नारायणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रोहिदास केदारी यांनी मानले.

Previous articleबेल्हे येथे रस्त्याचे श्रेय वादावरून मोठा वाद
Next articleनिधन वार्ता -विलासकाका वाबळे यांचे निधन