शिवस्फूर्ती पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नित्यानंद नेवकर,उपाध्यक्षपदी रवींद्र कोडीलकर यांची बिनविरोध निवड

नारायणगाव : (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यातील अग्रगण्य असणारी आदर्श पतसंस्था शिवस्फूर्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नित्यानंद नेवकर तर उपाध्यक्षपदी रवींद्र कोडीलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या प्रथम मीटिंगमध्ये सहाय्यक निबंध अधिकारी सचिन सरसमकर अध्यक्षतेखाली व संस्थेचे संस्थापक शेखर भागवत, संस्थापक अनिल तात्या दिवटे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली.

यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळ परशुराम वारुळे, सचिन विटे, शरद कदम, पोपट कुरुंद, संतोष खैरे, आशा डहाळे, रवींद्र कोडीलकर, नित्यानंद नेवकर, संतोष भोसले, मनीषा बोरा, सुनील खळदे या संचालकांच्या वतीने नित्यानंद नेवकर व रवींद्र कोडीलकर यांचा संस्थापक अनिल दिवटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

हा विशेष सन्मान माजी अध्यक्ष शेखर भागवत, सहाय्यक निवडणूक अधिकारी सचिन सरसमकर तसेच नारायणगावचे लोकनियुक्त माजी सरपंच योगेश पाटे, ग्रामपंचायत सदस्य बाळा वाव्हळ यांच्या उपस्थितीत झाला.

सरपंच पाटे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर निवडणूक अधिकारी व सहाय्यक निबंधक अधिकारी यांनी नवीन नियमावली ची माहिती दिली. शेखर भागवत यांनी अनिल तात्या यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेची वाटचाल अतिशय यशस्वीरित्या चालली आहे असे गौरवोद्गार काढले.
अध्यक्ष नेवकर, उपाध्यक्ष कोडीलकर यांनीही मनोगत व्यक्त केले. भाऊ वारूळे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

Previous articleसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत ; बैलगाडा शर्यतीच्या लढ्यावर चित्रपट बनवणार – खा. डॉ. अमोल कोल्हे
Next articleराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या ठिकेकरवाडी ग्रामपंचायतीचा ज्येष्ठ नागरिक संघाने केला सन्मान