महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन नारायणगावात साजरा

नारायणगाव , किरण वाजगे

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जुन्नर तालुक्यात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नारायणगाव येथील बौध्द विकास मंडळाच्या वतीने एक वही एक पेन हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवसेना नेते व माजी मंत्री सचिन अहिर हे देखील यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नारायणगाव येथे अभिवादन केले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर माजी आमदार बाळासाहेब दांगट तालुकाप्रमुख माऊली खंडागळे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश कवडे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, दिलीप वाजगे रशीद इनामदार सिद्धिक भाई शेख अनिल खैरे संतोष वाजगे, संतोष दांगट आरिफ आतार विकास तोडकरी तसेच आजी-माजी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

नारायणगाव येथील पूर्व वेशीजवळील चौकात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या ठिकाणी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य प्रतिमा उभारून एक वही एक पेन संकलन करण्यात आले. जमा झालेले पेन आणि वह्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमासाठी नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच बाबू पाटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते अमित बेनके , रोहिदास केदारी गणेश वाव्हळ, अक्षय वाव्हळ अशोक खरात, गोपी खंडे तसेच नारायणगावातील ग्रामस्थ, बौद्ध विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी व आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी सामूहिक त्रिशरण व पंचशील घेऊन महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Previous articleनारायणगाव जवळ बर्निंग बसचा थरात ; सुदैवाने जीवितहानी नाही
Next articleभाजपच्याच आमदारांना निधी मिळत नाही – आ. सचिन अहिर यांचा गौप्यस्फोट