नारायणगावात श्री मुक्ताई देवी पालखी ग्राम प्रदक्षिणा, रास दांडिया, रावण दहन आदी भरगच्च कार्यक्रमांनी नवरात्रोत्सवाची सांगता

 

किरण वाजगे

नारायणगावचे ग्रामदैवत श्री मुक्ताई देवी मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त महाआरती देवीचा जागर तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाबरोबरच विजयादशमीच्या दिवशी श्री मुक्ताई देवीच्या उत्सव मूर्तीची पालखीतून ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली.

याप्रसंगी श्री मुक्ताई देवस्थानचे पदाधिकारी एकनाथ शेटे, सरपंच योगेश पाटे तसेच सर्व संचालक मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते. या दिवसाचे विशेष म्हणजे देवीच्या मूर्तीची मिरवणूक, ओम साई सेवा मंडळाच्या वतीने श्री साईबाबांची पालखी मिरवणूक, रास दांडिया, रावण दहन आदी भरगच्च कार्यक्रमांनी नवरात्रोत्सवाची सांगता झाली.

नारायणगाव व वारूळवाडी येथील महासूर्योदय मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी चौक मित्र मंडळ, हनुमान चौक मित्र मंडळ, कुलस्वामिनी मित्र मंडळ पेठ आळी, पश्चिम बंगाल नवरात्र उत्सव समिती, शिवनेर मित्र मंडळ साने वस्ती, तसेच विविध गृहनिर्माण सोसायटी व शेत शिवारात रास दांडिया व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महासूर्योदय मंडळांनी आयोजित केलेल्या दांडिया रास दांडिया मध्ये आमदार अतुल बेनके, सरपंच योगेश पाटे, रोहिदास केदारी, पुष्पा जाधव, सुदीप कसाबे आदी मान्यवर उपस्थित होते.
पेठ आळी येथील कुलस्वामिनी मित्र मंडळाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ५२ फूटी रावण दहनाच्या कार्यक्रमाला शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी सरपंच योगेश पाटे, उपसरपंच आरिफ आतार, संतोष वाजगे, संतोष दांगट, आशिष माळवदकर, किरण वाजगे, ईश्वर पाटे, एडवोकेट राजेंद्र कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे, सानिल धनवे, राजेश वारुळे, गणेश शिंदे, माणिक मावळे, संतोष पाटे, राणी जाधव, रील स्टार शुभांगी रणदिवे, नागेश्वरी केदार, मंडळाचे अध्यक्ष सनी तलवार, शुभम नाईक, सुदीप कसाबे, अनिल दिवटे , रवींद्र कोडीलकर, रोहिदास वाजगे,अक्षय वाव्हळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleनाणेकरवाडी येथील शिक्षकाच्या प्रसंगावधनतेमुळे वाचले कासवाचे प्राण
Next articleमराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे अधिवेशन म्हणजे पिंपरी चिंचवड चिंचवडचा गौरव : मा.उपमुख्यमंत्री अजित पवार