पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा

उरुळी कांचन

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. भगत यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन करताना प्राचार्य डॉ. बी. ए. भगत म्हणाले, की राष्ट्राच्या विकासात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे योगदान महत्वपूर्ण आहे. राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य होतो.

राष्ट्रीय सेवा योजना कार्यशाळेत डॉ. अमोल बोत्रे यांनी स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास, राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे आणि अंमलबजावणी या संदर्भात मार्गदर्शन केले. प्रा.ज्ञानदेव पिंजारी यांनी स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वरूप, नियमित कार्यक्रम आणि विशेष शिबीरातील उपक्रम याविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास १५७ स्वयंसेवक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. रवींद्र मुंढे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. कामरुन्नीसा शेख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुप्रिता भोर यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अविनाश बोरकर, आय.क्यु.ए.सी. समन्वयक प्रा. नंदकिशोर मेटे, प्रा. विजय कानकाटे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डॉ. निलेश शितोळे, प्रा. शुभांगी रानवडे, प्रा.अंजली शिंदे या प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. या उपक्रमास प्रदीप राजपूत, मोरेश्वर बगाडे, विशाल महाडिक या कार्यालयीन कर्मचारी वर्गाचे विशेष सहकार्य लाभले.

Previous articleजुन्नर मधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत करून त्यांचे कर्ज माफ करा – किसान सभा
Next articleसिताबाई थिटे फार्मसी महाविद्यालयात जागतिक औषध निर्माता दिन साजरा