संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते गुरुवर्य सबनीस विद्यालयात ध्वजारोहण

नारायणगाव : (किरण वाजगे)

ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर येथे शाळेचे माजी विद्यार्थी, संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामोन्नती मंडळाच्या विविध विभागातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी,राज्य,राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू यांचा खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर, कार्यवाह रवींद्र पारगावकर, सर्व संचालक, सर्व विभागांचे प्रमुख,विद्यार्थी,पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी छात्रसेना, स्काऊट,गाईड मधील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक संचलन करून राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली. ग्रामोन्नती मंडळाच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांनी याप्रसंगी देशभक्तीपर समूहगीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा प्रमुख भीमराव पालवे आणि बबन गुळवे यांनी केले.

Previous articleअखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने श्री क्षेत्र भुलेश्वर येथे पोलीस बांधव, पत्रकार बांधवांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव
Next articleस्वर्गीय सुनील वाव्हळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त नेत्र शिबिराचे आयोजन