इतिहास अभ्यासक डॉ श्रीमंत कोकाटे यांच्या शिवचरित्र आणि विचारप्रवाह या पुस्तकाचे प्रकाशन जेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते संपन्न

उरुळी कांचन

देशातील विविध राज्ये मुघलांचे, पोर्तुगीजांचे, अदिलशाहीचे, यादवांचे राज्य अशा नावाने ओळखली गेली. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य भोसलेंचे राज्य म्हणून नाही तर रयतेचे राज्य म्हणून ओळखले गेले. छत्रपति शिवाजी महाराजांवर अनेकांनी लेखन केले असल्याचे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले.

इतिहास अभ्यासक डॉ श्रीमंत कोकाटे यांच्या शिवचरित्र आणि विचारप्रवाह या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जेष्ठ नेते शरद पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शाहू महाराज होते.

तर इतिहास संशोधक डॉ जयसिंग पवार, डॉ. पी.डी.जगताप, माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे, गणेश माने, डॉ श्रद्धा कुंभोजकर, राजकुमार घोगरे, रवि ढमढेरे, सह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक डॉ श्रीमंत कोकाटे यांनी मनोगत व्यक्त केले तर संयोजक राहुल पोकळे यांनी प्रास्ताविक केले.

Previous articleसंत शिरोमणी नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न
Next articleशतकपूर्ती महोत्सवानिमित्त वृक्षारोपण ग्रामपंचायत कार्यालय, पाणी परीक्षण प्रयोगशाळा, नदी घाटाचे उद्घाटन, टपाल व भूमापन कार्यालयाचे स्थलांतर कार्यक्रम उत्साहात