पवन गाडेकर यांच्या वाढदिवसा निमित्त रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने वृक्षारोपण

नारायणगाव : (किरण वाजगे)

रोटरी क्लब ऑफ शिवनेरी जुन्नर चे सदस्य तसेच आपला आवाज न्यूज नेटवर्क चे निवासी संपादक रोटेरीयन पवन गाडेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी च्या वतीने वनविभाग जुन्नर च्या धामणखेल हद्दीतील जागेत वड व पिंपळ या वृक्षांचे रोपण करण्यात आले.

पवन गाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आजवर रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी च्या सहकार्याने जवळपास एक हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.रविवार दि.१७ जुलै रोजी आयोजित या वृक्षारोपण कार्यक्रमा प्रसंगी जुन्नर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी व्ही सपकाळ, रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी चे अध्यक्ष अतुलसिंह परदेशी, तुषार लाहोरकर, पवन गाडेकर, माजी सैनिक रमेश खरमाळे,हितेंद्र गांधी,सुनिल जाधव, सचिन खत्री, विकी पंजवाणी, सुप्रित रेणूकदास, जुन्नर बार असोसिएशन चे अध्यक्ष केतन पडवळ, धामणखेल गावचे सरपंच संतोष जाधव, उपसरपंच देवराम कोंडे, मार्तंड खंडोबा देवस्थान ट्रस्ट धामणखेल चे अध्यक्ष गबाजी कोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

तीर्थक्षेत्र देवस्थान धामणखेल येथे श्री खंडोबाचे दर्शन घेऊन वृक्षारोपण करण्यात आले. धामणखेल चे सरपंच संतोष जाधव यांच्या हस्ते जुन्नर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी.व्ही.सपकाळ रोटरी क्लब ऑफ जुन्नर चे अध्यक्ष अतुलसिंह परदेशी,पवन गाडेकर व रोटरी सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.

Previous articleपवित्र श्री क्षेत्र भीमाशंकर खेड- आंबेगाव- जुन्नर तालुक्यांना एकत्रितपणे राष्ट्रीय महामार्गाने जोडण्यात यश -खा.कोल्हे
Next articleमाजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यानंतर जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांचा धक्कादायक निर्णय