शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वारावरील शिवपुतळ्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घेतले दर्शन

नारायणगाव : (किरण वाजगे)

२०२२ सालाच्या सुरुवातीला म्हणजेच ५ जानेवारी २०२२ रोजी जुन्नर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. तो म्हणजे नारायणगाव येथील शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वाराचे व या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या भव्य शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. याशिवाय पुतळ्याला गेल्या पाच ते सहा महिन्यात अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. तसेच या शिव पुतळ्याचे अनेक शिवप्रेमींनी व शिवभक्तांनी दर्शन घेत फोटो व्हिडिओ तसेच सेल्फी देखील काढले आहेत.

याच शिवपुतळ्याचे आज दर्शन पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी दर्शन घेतले आहे. त्यांच्या समवेत जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे उपस्थित होते. या प्रवेशद्वारावर नारायणगाव चे सरपंच योगेश पाटे यांनी पोलीस अधीक्षक डॉक्टर देशमुख यांचे तसेच श्री जवळे श्री ताटे यांचेही शिवप्रतिमा देऊन स्वागत केले.

यावेळी डॉ अभिनव देशमुख यांनी शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे व प्रवेशद्वाराच्या आखीव रेखीव कामाचे कौतुक केले. यावेळी नारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे उपाध्यक्ष किरण वाजगे, सामाजिक कार्यकर्ते ईश्वर पाटे, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटे, गणेश पाटे, संतोष दांगट, बाळा वाव्हळ, पप्पू भुमकर, निलेश दळवी, महेश शेळके, प्रिया शेळके तसेच राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleवडकी येथे शेतकऱ्यांना वेस्ट डिकंपोजर कल्चरचे वाटप
Next articleनारायणगाव पोलीस स्थानकात बालस्नेही पोलीस कक्षाचे उद्घाटन