निमदरी मध्ये एनएसएसच्या शिबिरात महिला जाणीव जागृती उपक्रमाचे आयोजन

नारायणगाव,किरण वाजगे

ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव, ग्रामपंचायत निमदरी व कुलस्वामिनी रेणुका माता देवस्थान ट्रस्ट निमदरी (ता. जुन्नर) येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर सुरू आहे. या शिबीराचा एक भाग म्हणून निमदरी मध्ये महिला जाणीव जागृती उपक्रमाचे आज आयोजन करण्यात आले. महिला जाणीव जागृती उपक्रमाचे उद्घाटन अंजली पारगावकर यांच्या हस्ते करण्यात आले व आपल्या मनोगतामध्ये त्यांनी महिला सबल व्हावी ती सक्षम व्हावी शिक्षणासोबतच योग साधनेच्या माध्यमातून महिलांनी स्वतःला विकसित करावे कारण स्त्रियांच्या आरोग्यावर कुटुंबाचे आरोग्य अवलंबून असते.

कार्यक्रमात आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सन्मान प्रा .वाघमारे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उद्देश राष्ट्रीय सेवा योजना पुणे ग्रामीणचे समन्वयक प्रा.डॉ श्रीकांत फुलसुंदर यांनी केले कार्यक्रमाचे अतिथी मनोगत फकीर आतार यांनी केले. त्या वेळी आपल्या जीवनामध्ये आईवडिलांचे स्थान महत्त्वपूर्ण असून बदलत्या आधुनिक काळात त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांना व त्याच प्रमाणे मुलींना आदराचे स्थान देणे गरजेचे असल्याचे मत फकीर आतार यांनी व्यक्त केले.

निमदरी ग्रामपंचायत अंतर्गत महिला जाणीव जागृती व्हावी यासाठी डिसेंट फाउंडेशन जुन्नरचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी आपल्या मनोगतामध्ये आजच्या काळातील काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर प्रकाश टाकला. जसे की सध्या आई व मुलीमध्ये वाढत चाललेली दरी, उचलली जाणारी चुकीची पावले, मोबाईलचा अतिरिक्त वापर यामुळे कमी होणारे संवाद तसेच करोना काळात ढासळलेले मानसिक आरोग्य कुटुंबासोबत कमी होणारा संवाद याला कारणीभूत आहे. संपादक किरण वाजगे यांनी विद्यार्थ्यांनी आपली ध्येयनिश्चिती महाविद्यालयीन जीवनातच करावी असे सांगून वृक्षारोपण व रक्तदान याविषयी माहिती दिली. तसेच डॉ. शुभांगी वल्हवणकर प्रकल्प समन्वयक डिसेंट फाउंडेशन जुन्नर डॉ.कल्याणी पुंडे यांनी आपल्या अमुल्य मार्गदर्शना मध्ये महिलांच्या आरोग्याविषयी प्रकर्षाने चर्चा घडवून आणली. स्वयंस्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

याप्रसंगी निमदरी गावातील रहिवासी महिलांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. यावेळी डिसेंट फाउंडेशन तर्फे उपस्थित सर्व ग्रामस्थ महिलांना व शिबिरार्थी विद्यार्थिनींना सॅनेटरी नॅपकिन व कळी उमलताना पुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी सहभागी ग्रामस्थ महिलांनी शंका विचारल्या व त्याची त्यांना थेट उत्तरे मिळाली.

या कार्यक्रमप्रसंगी निमदरी गावच्या सर्व महिला भगिनी, कार्यक्रम अधिकारी ओंकार मेहेर, विशाल औटी, श्‍वेता वाघमारे, मयूर मोरे, प्रसाद फुलसुंदर, सौरभ शिंदे, विजय कोल्हे, हरी कुकरेजा राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थी प्रतिनिधी पुर्वा कर्पे, साक्षी, बढेकर, साहिल इनामदार, शिबिरात सहभागी झालेले स्वयंसेवक उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. वैशाली मोढवे यांनी केले.तर प्रा.निकिता कुर्‍हाडे यांनी आभार मानले.

Previous articleनिमदरी मध्ये एनएसएसच्या शिबिरा महिला जाणीव जागृती उपक्रमाचे आयोजन
Next articleपरमात्म स्वरुप होण्यासाठी कर्मयोगाने सात्विकता जपावी- डॉ रविंद्र भोळे