परमात्म स्वरुप होण्यासाठी कर्मयोगाने सात्विकता जपावी- डॉ रविंद्र भोळे

उरुळी कांचन

पृथ्वीवरील जन्मालाल आलेल्या प्रत्येक जिवात्म्याला कधी ना कधी मरण पत्करावे लागतेच,कोणीही अमर नाही. भगवंत चरणी विलीन होईपर्यंत जन्म-मृत्यू ,सुख-दुख भोगावे लागतात. परमात्मस्वरुप होण्यासाठी विकर्म, अकर्म, सोडून निष्काम कर्मयोग अंगिकारावा,सात्विक कर्मे करावी, तसेच निष्काम कर्मयोगाने सात्विकता जपावी असे मत जेष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले.

पुरंदर तालूक्यातील सिंगापूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी प्रवचन, प्रबोधन करताना डॉ. रविंद्र भोळे म्हणाले की, त्याग व सात्विक कर्मे करून मनुष्याला भगवंत कर्माकडे प्रवृत्त करीत असतात. मोक्ष प्राप्तीसाठी निष्काम कर्मयोग महत्वाचा आहे. व्यसने, रजगुण, तमगुण नष्ट करण्यासाठी अध्यात्मिक उपक्रम म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत उपयोगी असल्याचे मत डॉ रविंद्र भोळे यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील मान्यवर ,भाविक भक्त,गावकरी ,वारकरी उपस्थित होते.

Previous articleनिमदरी मध्ये एनएसएसच्या शिबिरात महिला जाणीव जागृती उपक्रमाचे आयोजन
Next articleमहिलांना व्यावसायीकदृष्ट्या सक्षम बनवायचं असेल तर त्यांच्या कलागुणांना वाव देण्याची गरज- सविता कांचन