शिरोलोतील युवक व युवतींची नारायणगडावर दुर्गसंवर्धन मोहिम

राजगुरूनगर- विश्व हिंदू परिषद,बजरंग दल-दुर्गा वाहिनी,दुर्ग संवर्धन विभाग शिरोली आणि जाखमाता शिवजयंती उत्सव समिती शिरोलीतील युवक आणि युवतीनी किल्ले नारायणगड या ठिकाणी आयोजित केलेली पाचवी दुर्गसंवर्धन मोहिम यशस्वी पुर्ण केले.

( दि.२६) रोजी किल्ले नारायणगडावर दुर्गसंवर्धन विभागाची पाचवी मोहीम यशस्वी रित्या पार पडली. चौथी मोहीम सुद्धा याच गडावर पार पडली होती, त्यावेळी गडावरील झाडे झुडपे काढण्यात आली होती.

सलग दोन दिवस राबविण्यात आलेल्या त्या मोहीमेत किल्लेदार वाडा म्हणुन ओळखला जाणाऱ्या वाड्याच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला.

या मोहिमेत वाड्याचे जे काही अवशेष राहिले होते त्यांचे संवर्धन करण्यासाठी आमच्या सर्व दुर्गसंवर्धन टिम ने मिळुन महत्वाचे काम त्या ठिकाणी केलं.या दिवशी खुप खडतर काम होते ते म्हणजे ढासळलेली तटबंदी आणि वाड्याच्या काही भिंतींच्या दगडी(राहिलेल्या अवशेषांपैकी) पुन्हा लावण्यात आल्या.

गडावर करण्यासाठी खुप काम आहेत,बऱ्याच पाण्याच्या टाक्या आहेत ज्या गाडल्या गेल्या आहेत, वाड्याचे पडलेलं प्रवेश द्वार असेल अशी बरीच कामे आजुन बाकी आहेत. हि कामं सुद्धा लवकरच करण्यात येणार आहे. अशी माहिती कु मयुर लोहोट आणि शेखर सावंत यांनी दिली.

Previous articleजुन्नर – किल्ले शिवनेरी ते पुणे लवकरच धावणार PMPL
Next articleखासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याकडून नथुराम गोडसे च्या भूमिकेवरून आत्मक्लेश