मेळघाट प्रकल्पाचे जनक पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांची उरुळी कांचन येथील टिळेकर मळा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेट

अमोल भोसले,उरुळी कांचन

पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांनी उरुळी कांचन टिळेकर मळा प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शिकवला धडा, मुलांनी याच वयामध्ये योग्य मार्ग निवडावा तरच पुढचे भवितव्य सुखमय जाईल असे डाॅ कोल्हे बोलत होते. ते पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज, माता सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, साने गुरुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आण्णा भाऊ साठे, या थोर महान व्यक्ती विषयी डॉ कोल्हे यांनी माहिती दिली. प्रत्येकाने भारत जोडो या उद्दीष्टाने डॉ मणीभाई देसाई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करावे.  त्याचबरोबर मुलानी मजबूत राहण्याकरता व्यायामाचे विषयी जागृती केली. आज कोल्हे हे उरुळी कांचन येथील आदिवासी समाजसेवक व साहित्यिक, नामदेव भोसले व त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्याकरता आले होते.

यावेळी त्यांनी मणिभाई देसाई यांच्या बाईक संस्थेला भेट दिली बायफ संस्थेची सखोल माहिती संस्थेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत मनोहर कांचन यांनी बायफ संस्थेची व महात्मा गांधी विद्यालय आणि उरुळी कांचन भवरापूर, टिळेकर वाडी, या येथील ऐतिहासिक माहिती डॉ. कोल्हे यांना दिली. पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, व पद्मश्री,डाॅ. स्मिताताई कोल्हे यांच्या हस्ते टिळेकर मळा प्राथमिक शाळेत वृक्षारोपण करण्यात आले तसेच कोल्हे व सौ स्मिताताई कोल्हे यांनी विद्यार्थीना मार्गदर्शन केले.

या वेळी भवरापूरचे माजी सरपंच सुभाष साठे यांनी
पद्मश्री रविंद्रजी कोल्हे, व पद्मश्री स्मिताताई कोल्हे, आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला. यावेळी उरुळी कांचनचे ग्रामविकास अधिकारी हनुमंत डोळस, ग्रामपंचायत सदस्य सुनिल तांबे, ग्रामपंचायतचे माजी सदस्य राजेंद्र टिळेकर, माजी उपसरपंच शामराव कोतवाल, पोपटराव ताम्हाणे, संभाजी साठे, बाळासाहेब चौवरे, सचिन टिळेकर, टिळेकर मळा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापीका लिना शहा तसेच शिक्षक स्टाप, इतर मान्यवर उपस्थित होते.

Previous articleखेड पोलिस स्टेशनच्या पुढाकाराने व हुतात्मा राजगुरु सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने निराधारांना मिळाला आधार
Next articleशरद पवार वाढदिवसाच्या ‘व्हर्च्युअल रॅली’ च्या माध्यमातून जनतेच्या शुभेच्छा स्वीकारणार – जयंत पाटील