प्रवचनाचे मानधन नाकारून कोरोनाने वडील गमावलेल्या मुलाच्या शिक्षणासाठी पंकज महाराज गावडे यांनी ६ लाख रुपयांची केली मदत

किरण वाजगे, नारायणगाव

पुणे जिल्हा तसेच जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध प्रवचनकार प्रा पंकज महाराज गावडे ह्यांनी कोरोना मुळे जीव गमवावा लागलेल्या आपल्या विद्यार्थ्यांच्या मुलाचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले

.
स्वर्गीय रुपेश तानाजी फुलसुंदर ह्यांचे साडेपाच महिन्याचे प्रवचन केल्यानंतर गावडे महाराज यांनी फुलसुंदर कुटुंबीयांकडून देऊ करत असलेले मानधन नाकारले. याउलट परिवाराची न भरून येणारी हानी लक्षात घेऊन स्व. रुपेश फुलसुंदर ह्यांच्या पश्चात त्यांचा एकुलता एक मुलगा अवधूत फुलसुंदर ह्याला इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी पर्यंत चांगल्या शिक्षणासाठी दर वर्षी ५० हजार रुपये मदत म्हणजेच एकूण ६ लाख रुपयांची तरतूद आपल्या प्रवचने आणि व्याख्यांनातून मिळणाऱ्या मानधनातून चालवत असलेल्या हिरा पंकज सोशल फाऊंडेशन कडून केली.

त्यासाठी सर्व कागद कागदपत्रांची पूर्तता करून त्या बाबतचे पत्र स्वर्गीय रुपेश ह्यांच्या आई आणि अवधूत च्या आजी श्रीमती मंगल तानाजी फुलसुंदर ह्यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले. ह्या बाबत रुपेश ह्यांची पत्नी श्रीमती आरती, बंधू कल्पेश ह्यांनी पंकज महाराज ह्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. आता अवधूत चे जिवन आणि भविष्य नक्कीच चांगले होणार अशा भावना व्यक्त केल्या. आई मंगल ह्यांनी रुपेश तर परत येणार नाही परंतु तुम्ही अवधूत जी जबाबदारी घेतली त्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कल्पेश आणि त्यांची आई मंगल ह्यांनी खडी फोडण्याचे काम करून रुपेश ला बीएससी पर्यंत शिकवले होते. तो नोकरी करत असताना निवेदन क्षेत्रात देखील खूप पुढे आला होता. ह्यातुन कुटुंब सावरत असताना त्याचा कोरोना मुळे उपचार दरम्यान भोसरी येथे दुर्देवी अंत झाला.

रुपेश देखील दोन वर्षाचा असताना त्याचे वडील वारले होते व आज रुपेश देखील मागे लहान अवधूत ला ठेऊन अचानक जगाचा निरोप घेऊन कायमचा निघून गेला.
हभप पंकज गावडे हे संवेदनशील मनाचे असून त्यांनी ह्या कुटुंबासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे जे समाजाला एक आदर्श रस्ता दाखवणारे आहे अशी भावना जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे ह्यांनी व्यक्त केली. तर माजी आमदार शरद सोनवणे ह्यांनी देखील पंकज महाराज ह्यांचे कार्य आम्ही पुढे घेऊन जाऊ असा शब्द दिला व तालुक्याचे वतीने महाराजांचे आभार व्यक्त केले.

तर रुपेश चे चुलते प्रभाकर महाराज फुलसुंदर ह्यांनी पंकज महाराज येथे घ्यायला नाही तर द्यायला आले होते. ते म्हणजे आध्यात्म क्षेत्रातील एक ज्ञानवंत आणि चारित्र्य संपन्न,दानशूर व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले.
ह्या कार्यक्रमासाठी खेड वरून आलेले हुतात्मा राजगुरू फाऊंडेशन चे विश्वस्त कैलास दुधाळे ह्यांनी रुपेश च्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी फाऊंडेशन चे खजिनदार कृषी रत्न जितेंद्र बिडवई, पिंपळगाव तर्फे नारायणगांव सोसायटीचे चेअरमन राजेश खांडगे, निसर्ग फाऊंडेशन चे विश्वस्त राहुल गावडे,प्रा. शरद मनसुख आदी उपस्थित होते.

Previous articleअपघातग्रस्त ठिकाणी बांधकाम खात्याने तातडीने केली दुरुस्तीला सुरुवात ; अजिंक्य टेकवडे यांच्या प्रयत्नांना यश
Next articleजिल्हा परिषद ,पंचायत समिती,नगर परिषद निवडणुका जिंकून शिवसेना इतिहास घडवणार – सचिन अहिर