नारायणगाव येथे गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत

नारायणगाव किरण वाजगे

नारायणगाव पोलिस स्थानकाअंतर्गत परिसरातील गावांमध्ये गणेश विसर्जन मिरवणुक शांततेत पार पडली.
काही मर्यादित मंडळांनी आकर्षक सजावट करून गणेश विसर्जन मिरवणुक काढली.नारायणगाव शहरामध्ये काही ठराविक सार्वजनिक गणेश मंडळांनी आकर्षक फुलांच्या व कलात्मक देखाव्यांच्या सजावटीमध्ये तसेच पारंपारिक वाद्यांच्या निनादामध्ये मिरवणूक काढली.


यामध्ये श्री गणेशोत्सव मंडळ वाजगे आळी, मुक्ताई मंडळ भाजी बाजार, मागासवर्गिय मित्र मंडळ मावळे आळी, नवशक्ती मित्र मंडळ वारूळवाडी, प्रियदर्शनी मित्र मंडळ, हनुमान चौक मित्र मंडळ, काशी विश्वेश्वर मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ खोडद रोड, कुलस्वामिनी मित्र मंडळ पेठ आळी, खंडोबा मित्र मंडळ खैरेआळी आदी सार्वजनिक गणेश मंडळांनी शांततेत व साधेपणाने श्री गणेशाचे विसर्जन केले.दर्शन उद्योग समूहाच्या वतीने अण्णा लोणकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी दुपारच्या भोजनाची व्यवस्था केली.


नारायणगाव ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच योगेश पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशमूर्ती विसर्जनासाठी ठिकठिकाणी हौद ठेवले होते. काहीजणांनी मीना नदीपात्रात श्री गणेश मूर्ती विसर्जन न करता ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या ताब्यात मूर्ती देऊन नदीच्या कडेलाच एक मोठा खड्ड्यात गणेश मूर्ती चे विसर्जन केले. मात्र काही भाविकांनी नदीपात्रातच विसर्जन केले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा गणेश मूर्ती ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या ताब्यात न देता अनेक घरगुती बाप्पांचे विसर्जन येडगाव धरण व ओझर येथील कुकडी नदीच्या पात्रात, मीना शाखा कालवा व डिंबा धरणाचा कालवा तसेच चिमणवाडी परिसरात करण्यात आले.


नारायणगाव पोलिस स्थानकाच्या वतीने पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

Previous articleलिलावती बोधे यांची कोरेगांव मुळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड
Next articleबोरियेंदी येथे कोरोना नियंत्रण कक्षाचे सरपंच गणेश दौंडकर यांच्या हस्ते उदघाटन