लिलावती बोधे यांची कोरेगांव मुळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड

अमोल भोसले, उरुळी कांचन

हवेली तालुक्यातील कोरेगांव मुळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी लिलावती बापूसाहेब बोधे यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच मनिषा कड यांनी राजीनामा दिल्याने सदरच्या जागेवर निवडणूक घेण्यात आली.


सदरची उपसरपंच पदाची निवडणूक सरपंच विठ्ठल शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ग्रामविकास आधिकारी राजेंद्र कदम यांनी निवडणूकीचे कामकाज पाहिले.

यावेळी हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय माजी संचालक – ग्रामपंचायत सदस्य बापुसाहेब बोधे, भानुदास जेधे, दत्तात्रय काकडे, सचिन निकाळजे, सदस्या अश्विनी कड, वैशाली सावंत, राधिका काकडे, मंगल पवार, पोलीस पाटील वर्षा कड, तंटामुक्ती अध्यक्ष संपत डिंबळे, बबन कोलते, जयसिंग भोसले, मानसिंग कड, धैर्यसिंग शितोळे, प्रकाश काकडे, गणेश शितोळे, राजेंद्र बोधे, संतोष बोधे, विठ्ठल कोलते, बाळासाहेब बोधे, प्रविण शितोळे, अमित सावंत, संतोष काकडे, आप्पा कड, बाजीराव कड, प्रविण काकडे, नितीन कड, अशोक कारंडे, सुरेश वाळेकर, सचिन कड, कचरु कड, मोहन चितळकर आदी उपस्थित होते.


गावच्या सर्वागिण विकास कामासाठी सरपंच – ग्रामपंचायत सदस्य आम्ही सर्व जण प्रयत्न करु तसेच विकासकामे करत असताना नागरिकांचे सहकार्य असणे आवश्यक असल्याचे मत उपसरपंच लिलावती बोधे यांनी व्यक्त केले.

Previous articleखा. डॉ.अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जगदंब प्रतिष्ठान’ आयोजित १४ वर्षाखालील लहान मुलांचे आरोग्य शिबिर उत्साहात
Next articleनारायणगाव येथे गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत