श्रीराम पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

नारायणगाव,किरण वाजगे

जुन्नर तालुक्याचे माजी आमदार व संस्थेचे संस्थापक वल्लभ बेनके यांनी सुरू केलेल्या श्रीराम नागरी पतसंस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली. आजपर्यंत संस्थेने मिळवलेल्या विश्वासार्हतेमुळे उपस्थित सभासदांची संख्या लक्षणीय होती. राष्ट्रगीत, प्रतिमापूजन व मृतांस श्रद्धांजली अर्पण करून वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात झाली.

वार्षिक सर्वसाधारण सभेत तालुक्यातील विशेष यश संपादन केलेल्या शुभम बकाळ, तनुजा सदाकाळ, विशाल ढोले, मनमित बनकर, ज्योत्सना भालेकर, ईश्वर गायकर, नामदेव काशीद, अंकिता बोऱ्हाडे, सोनल भोर, समीर पानसरे यांचा संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी श्रीराम नागरी पतसंस्थेचे चेअरमन तानाजी डेरे, व्हाईस चेअरमन शशिकांत वाजगे, संचालक राजश्रीताई बेनके, अमित बेनके, गजानन श्रीवत, अनिल थोरात, येल्लू लोखंडे, अनिल डेरे, ज्ञानेश्वर रासने, विजय घोगरे, नवनाथ चौगुले, दयानंद डुंबरे, विजया उनकुले, तज्ञ संचालक विशाल भुजबळ, बाळासाहेब सदाकाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश नलावडे उपस्थित होते.

संस्थेचे चेअरमन तानाजी डेरे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या आशीर्वादाने व तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था आर्थिक व गुणात्मक प्रगतीची वाटचाल करीत आहे. संस्थेच्या सर्व शाखा संगणीकृत व सीबीएस केले असून कर्मचारी ग्राहक सभासदांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. संस्थेच्या ठेवीत १९० कोटीपर्यंत वाढ झाली असून ३.७५ कोटींचा नफा झाला आहे. संचालक मंडळाने सभासदांना पंधरा टक्के लाभांश व दिवाळी भेट वस्तू देण्याचा निर्णय घेतला त्यास सभासदांनी मान्यता दिली. संस्थेला ‘अ’ वर्ग मिळालेला असून चालू वर्षी सभासदांचा दोन लाखांचा अपघाती विमा उतरवल्याचे सांगितले.

याप्रसंगी संस्थेचे जेष्ठ सभासद विजय तोडकर, मनोहर डोंगरे, राजेश चव्हाण, नारायणगाव विकास सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे यांनी मनोगत व्यक्त केले.

संस्थेचे संचालक अमित बेनके म्हणाले, वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी अहवालाचे वाचन करून शंका आल्यास प्रश्न विचारले पाहिजे. तरच संस्था योग्य मार्गाने व नियमाने वाटचाल करीत असल्याचे लक्षात येईल. सभासद, ठेवीदार, संचालक मंडळ व संस्थेचे कर्मचारी यांच्यातील विश्वासामुळे संस्थेने आजपर्यंत प्रगती केली असून मनोबल वाढले आहे. संस्थेचा बेल्हा, बनकर फाटा, वाशी व तळेगाव दाभाडे येथे नवीन शाखा सुरू करण्याचा मानस असल्याचे सांगितले.

Previous articleघरफोडी करणारी टोळी गजाआड: नारायणगाव पोलिसांची कामगिरी
Next articleसाहित्य क्षेत्रातून शरद गोरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करावे- श्रीपाल सबनीस