पिंपळगाव तर्फे नारायणगाव कुलस्वामीनगर येथे यात्रोत्सव

नारायणगाव : (किरण वाजगे)
जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव कुलस्वामीनगर येथे दि १५ ते १८ एप्रिल या कालावधीत श्री कुलस्वामी खंडेराय यात्रोत्सव साजरा होत आहे .याचबरोबर भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती यात्रा कमिटी अध्यक्ष योगेश रायकर यांनी दिली.

दि १५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता पूजन व रुद्राभिषेक ,सकाळी ८ वाजता मांडव डहाळे आणि घागरी मिरवणूक तसेच धार्मिक कार्यक्रम होईल ,रात्री ७ वा कीर्तन तसेच दि १६ व दि १७ रोजी रात्री कीर्तन त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. दि १८ एप्रिल रोजी सकाळी ९ पासून बैलगाडा शर्यतीला सुरवात होईल. त्यात प्रथम क्रमांकासाठी ५१००० रुपये , द्वितीय ४१००० रुपये , तृतीय ३१०००रूपये , चतुर्थ १५००० रुपये तसेच घाटाचा राजा ,फळीफोड इतर ही विशेष बक्षिसे ठेवण्यात आली आहे.या शर्यती साठी टोकन रविवार दि १६ एप्रिल ला खंडेराव मंदिर येथे सकाळी ११ वाजता ठेवण्यात आले आहे.

Previous articleपाटस येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
Next articleउत्तर पुणे जिल्ह्यातील नारायणगावची सर्वात मोठी रविवारपासून सुरू