कु.जान्हवी धराडे हिला राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक

मोसीन काठेवाडी, घोडेगाव

घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयातील प्रथम वर्ष विज्ञान या वर्गातील विद्यार्थिनी कु.जान्हवी धराडे हिला,श्री मनोहर हरी खापणे कला व वाणिज्य महाविद्यालय,मु.पो.रायपाटण ता.राजापूर जि.रत्नागिरी यांनी आयोजित केलेल्या कै.हरी तुकाराम खापणे स्मृती प्रित्यर्थ राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धेत कु.जान्हवीला रू.1500/- चे दुसरे बक्षिस प्राप्त झाले आहे.

बी.बी.ए.विभागातील प्रा. सृष्टी बोराडे यांनी तिला मार्गदर्शन केले आहे.सायबर गुन्ह्यांचा धोका आणि उपाय या विषयावर तिने निबंध लेखन केले होते.

Previous article१७ वर्षीय मुलाचे अपहरण नंतर हातपाय बांधून रेल्वेखाली टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न दौंड तालुक्यातील केडगाव येथील धक्कादायक प्रकार
Next articleशिनोली येथे वनविभागाच्या वतीने डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेच्या लाभार्थ्यांना साहित्य वाटप तसेच नूतन निवासस्थानाचे उद्घाटन संपन्न